विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील खंदे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ आणखी घटले असून, आता ठाकरे गटाकडे केवळ 5 आमदार उरले आहेत. या पक्षांतरानंतर आता विधान परिषदेत कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत? याबाबत जाणून घेऊया..
विधान परिषदेत कोणत्या पक्षात किती आमदार?
भाजप – 35
शिवसेना शिंदे गट – 13
राष्ट्रवादी अजित पवार गट – 10
शिवसेना ठाकरे गट – 05
काँग्रेस – 05
राष्ट्रवादी शरद पवार गट – 02
अपक्ष – 3
ठाकरे गटाचे विधान परिषदेत उरलेले 5 आमदार
- अनिल परब
- मिलिंद नार्वेकर
- अंबादास दानवे
- ज. मो. अभ्यंकर
- सुनील शिंदे











Leave a Reply