कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे.
विशेष म्हणजे त्यांच्यावर कसलेही कर्ज नाही.शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे.
शाहूंकडे एक कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.














