काही वर्षांपूर्वी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत माहिती पोहोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे रेडिओ मानले जायचे. काळाच्या ओघात तंत्रज्ञान बदलले. संपर्काची साधने बदलली तरी आजही रेडिओ कायम आहे. पण, 1980 पूर्वी रेडिओ घेण्यासाठीदेखील दर तीन महिन्याला परवाना घ्यावा लागायचा. पोस्ट ऑफिसमध्ये तीन रुपये शुल्क भरल्यावर तो चालवता यायचा. पैसे न भरल्यास रेडिओ जप्त व्हायचा, अशी माहिती रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी दिली. महाविद्यालयात अधीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी संजय पवार आपला छंद जोपासत जवळपास साडेसातशे रेडिओंचे संग्रह त्यांनी तयार केला. आजही त्यामध्ये 70 टक्के संच कार्यरत असून मनोरंजन करण्याच्या स्थितीत आहेत. जागतिक रेडिओ दिनानिमित्त त्यांच्या संग्रहालयाचे प्रदर्शन शहरात लावण्यात येते. रेडिओ प्रेमींसाठी पर्वणी समजली जाते. आजच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं मत संजय पवार यांनी व्यक्त केलं.
शहरातील रेडिओप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेले संजय पवार यांच्याकडे 1940 पासूनचे रेडिओ संच संग्रहित करण्यात आले आहेत. विशेषतः मर्फी कंपनीचा स्वातंत्र्यपूर्व काळातील मर्फी कंपनीचा रेडिओ खास आकर्षण मानला जातोय. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे हिटर गरम झाल्यावर पाणी गरम होते. त्याप्रमाणे त्या या रेडिओमध्ये असलेली ट्यूब गरम झाल्यावर आपोआप फ्रेफवेंसी पकडण्यास सुरुवात करते. जगभरातील स्टेशन त्यावर आजही मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेले कराची, दिल्ली, मद्रास सारखे स्टेशन त्यावर चालतात. असे अनेक संच या संग्रहालयात प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.
जुन्या काळी रेडिओ आणि रेकॉर्ड प्लेअर चांगलाच मनमोहक ठरत असायचा. रेडिओ, त्याकाळी असलेली मोठी सीडी म्हणजे रेकॉर्ड प्लेअर एकत्रित रित्या एकाच संचात असल्याचे ज्याला खाली मोठे स्पीकर देखील होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड प्लेअर मध्ये एकाचवेळी सात रेकॉर्ड लावण्याची प्रणाली होती, ज्या एकामागे एक आपलोआप सुरू होतात. देशात वीस संच आजही कार्यरत आहेत. त्यातील तीन संच रेडिओप्रेमी संजय पवार यांच्याकडे असून या प्रदर्शनात त्यांना सुरू करून दाखवण्यात आले. जुन्या काळही अशी प्रणाली होती जी आजही कार्यरत ठेवली त्याबद्दल प्रदर्शनास आलेल्या प्रेमींनी कौतुक आणि आभार व्यक्त केले.
साडेसातशे रेडिओंचे प्रदर्शन:
शहरातील एन आठ परिसरातील संजय पवार यांच्याकडे जवळपास साडेसातशे रेडिओ जतन करून ठेवण्यात आले आहे. मागील तीन वर्षांपासून जगातील रेडिओ दिनानिमित्त त्यांनी त्यांच्याकडील सर्व प्रकाराच्या रेडिओंचे प्रदर्शन सुरू करण्यास सुरुवात केली. प्रतिवर्षी चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने अबाल वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत रेडिओ बाबत प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होत असल्याचं संजय पवार यांनी सांगितले. 1940 पासूनचे वॉल रेडिओ ते आजच्या काळातील सारेगामा कारवा पर्यंत सर्व संच त्यात समाविष्ट आहेत. इंग्रजांनी आणलेले काही संच त्यात आकर्षण ठरत आहेत, विशेष म्हणजे आजही ते कार्यान्वित आहेत. त्यामुळे अशा अनोख्या या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळते.
वृद्धांची विशेष गर्दी:
जुन्या काळी रेडिओ रेडिओ असणे ही देखील प्रतिष्ठेची बाब समजली जायची. कोणाकडे तो असला तरी त्याला हात लावणे म्हणजे एखादा गुन्हा केल्यासारखे होते. मात्र नंतर रेडिओ सार्वजनिक आणि हाताळण्यास सोपा झाला आणि प्रत्येकाकडे तो पहायला मिळाला. मात्र तीन चाळीस वर्षांपूर्वी असलेली पिढी ज्यांना रेडिओ म्हणजे आकर्षण होते मात्र हाताळता आला नाही असे अनेक वृद्ध हे प्रदर्शन पाहण्यास येत आहेत. त्यावेळी हात लावता आली त्यामुळे आजतरी त्याला पहावे त्यामुळे आल्याची भावना प्रदर्शन पाहणाऱ्या काही वृद्धांना व्यक्त केली.
संजय पवार यांनी 1990 पासून आपला छंद जोपासण्यास सुरुवात केली. काही मित्र परिवार यांच्याकडे असलेले संच, जुन्या बाजारात भंगार म्हणून फेकलेले संघ, मुंबई पासून सर्वच ठिकाणी उपलब्ध असलेले संघ संजय पवार यांनी एकत्रित केले. हे संच सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी देशभरातील अनेक रेडिओप्रेमी त्यांनी सोबत जोडले. इतकंच नाही तर विदेशातील काही अभ्यासू प्रेमी देखील त्यांनी सोबत जोडले. आजही त्यांच्यासोबत चर्चा करून काम सुरू असल्याच संजय पवार यांनी सांगितले. पुढच्या पिढीला रेडिओबाबत अवगत करणे आणि त्याप्रती श्रोते वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी सांगितले. नुसते रेडिओ नाही तर वॉकमन टिव्ही, टेलिफोन, ग्रामाफोन, स्पीकर, कॅसेट प्लेअर यांचादेखील संग्रह त्यांनी केला आहे. संगीताप्रती वेगळं प्रेम असल्यानं त्यांचा संग्रह केला आहे. आजही अनेक कॅसेट प्लेअर आणि स्पीकर काम करतात. विशेषतः पॉकेट रेडिओ आणि कॅसेल प्लेअर आकर्षित करतात, असेही संजय पवार यांनी सांगितलं.














