kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात?

सध्या देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश. संसदेच्या दालनांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत आणि सोशल मीडिया फिडवरही सगळीकडे फक्त आणि फक्त राघव चड्ढा यांच्याच चर्चा आहेत. राघव चढ्ढा यांनी ‘आम आदमी पक्ष’ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. राघव चढ्ढा यांच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय. काहींना राघव चड्ढा यांचा हा निर्णय खटकला आहे. अशातच आता दिग्गज क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी, राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

‘टॉप सिक्रेट’ पॉडकास्टमध्ये, नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव चढ्ढा यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं खळबळजनक कारण उघड केलं आहे. त्यांनी असा दावा केलाय की, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यामुळेच राघव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की, प्रियांका चोप्रा हिच्या हे लक्षात आलेलं की ‘हे लोक’ (म्हणजेच आम आदमी पक्ष) राघव चड्ढा यांना लक्ष्य करत आहेत. याचाच परिणाम म्हणून, राघव चड्ढा यांना ईडी कारवाईला सामोरं जावं लागलं असतं.

नवज्योत कौर सिद्धू यांनी पुढे बोलताना ठामपणे सांगितलं की, आपली बहीण परिणीती चोप्रा हिच्यासाठीच प्रियांका चोप्रा हिनं राघव चड्ढा यांना वाचवलं. नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीनं हे देखील नमूद केलंय की, राघव चड्ढा हे आम आदमी पक्ष सोडण्याच्या बेतात आहेत, याची त्यांना आधीच कल्पना होती. पक्षाला असं वाटू लागलं होतं की, राघव आता त्यांच्या वतीनं आवाज उठवत नाहीत. यानंतर, ते एका संघर्षात अडकले. मला हे आवर्जुन नमूद करायचं आहे की, प्रत्येक शांत व्यक्ती ही, स्वतःच्या परीनं, स्वतःच एक स्वतंत्र पक्ष असते. राघव चढ्ढा आज, चार वर्षांनंतर, आपलं म्हणणे मांडत आहेत… पण त्यांनी दीड वर्षांपूर्वीच आपल्या चिंता व्यक्त करायला हव्या होत्या. जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल, तर त्याच वेळी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या त्यांच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः जेन-Z आणि काही सेलिब्रिटींनाही हा निर्णय पसंत पडलेला दिसत नाही. भाजप प्रवेशानंतर अवघ्या एका दिवसांत त्यांच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या दोन मिलियनहून अधिकांनी घटल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कुनिका सदानंद आणि अभिनेते प्रकाश राज यांनीही राघव चड्ढा यांच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या दाव्यांवर अद्याप प्रियंका चोपडा, परिणीती चोपडा किंवा स्वतः राघव चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *