बिहारमधील कटिहार इथं एक भीषण रस्ते अपघात घडला. शनिवारी संध्याकाळी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस आणि पिकअपचा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर काईरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसगडा चौकाजवळ झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनमधले नागरिक एका धार्मिक कार्यक्रमातून घरी परतत होते. यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या एका बसनं पिकअपला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातात पिकअप वाहन चक्काचूर झाले. यात अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर झालेल्या अपघातामध्ये अनेकांचा जागेवर मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिकांनी कोईरा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तसंच अपघातातील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
“बस चालकानं दारू प्यायली होती. तो महामार्गावर खूप भरधाव वेगानं वाहन चालवत होता. त्याच्या चुकीमुळं अपघात झाला. या घटनेसाठी बस चालकच पूर्णपणे जबाबदार आहे,” असं रहिवासी दिलीप कुमार यांनी सांगितलं.
अपघातानंतर लोक संताप व्यक्त करत होते. त्यांच्या मते महामार्गावर त्याच ठिकाणी नियमितपणे अपघात होत असतात. परंतु, याबाबत पोलीस कोणतीही व्यवस्था करत नाहीत. प्रशासन सतर्क राहिल्यास असं अपघात होणार नाहीत, असं स्थानिकांनी सांगितलं.
"पिकअपमधून 35-40 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पंचवीस जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाठवलं आहे. ते सर्व पूर्णियाचं रहिवासी होते आणि झारखंडहून घरी परतत होते, - रंजन कुमार सिंग, डीएसपी, कोईरा
















Leave a Reply