‘लॉक अप 2’ या रिॲलिटी शोमध्ये सध्या जोरदार नाट्यमय गोष्टी घडताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना नुकताच या शोच्या एका एपिसोडमध्ये दिसला. पत्नी आकांक्षा चमोलाने घटस्फोटाची घोषणा केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपली नाराजी व्यक्त करताना गौरव आकांक्षाला स्पष्टपणे म्हणाले, “आपण या विषयावर फक्त आपापसातच चर्चा केली आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अजून कोणत्याही न्यायालयात सह्या झालेल्या नाहीत, तसेच आपला घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम झालेला नाही. जेव्हा गौरवने आकांक्षाला याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, “तु ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार होता, तेव्हा हा निर्णय घेतला होता.” आकांक्षाला मध्येच थांबवत गौरव म्हणाला, “तू शोमध्ये जाण्याच्या अवघ्या सात दिवस आधी माझ्यासाठी ही मोठी अडचण निर्माण केली आहेस. शांत डोक्याने विचार कर. अशा परिस्थितीत कोणी काय करेल?” मी तिथे जाऊन माझ्या धोकादायक स्टंटवर लक्ष केंद्रित करू की माझ्या मनात सुरू असलेल्या प्रचंड गोंधळाला हाताळू? एकाच वेळी दोन्ही गोष्टी सांभाळणे माझ्यासाठी खूप कठीण होते.”
तो पुढे म्हणाला, “बरं, त्या घटनेला आता बराच काळ लोटला आहे. त्यावेळी आमच्यात जे काही घडलं होतं, आम्ही पुढे निघून गेलो आहोत.” यानंतर, शोची होस्ट फराह खानने गौरव आणि आकांक्षाला एकमेकांशी बोलण्यासाठी तिची केबिन दिली. केबिनमध्ये प्रवेश करताच गौरव आकांक्षाशी मनमोकळेपणाने बोलला. गौरव म्हणाला, “मे महिन्यात, जेव्हा मी माझ्या नवीन शोसाठी निघत होतो, तेव्हा याबद्दल बोललो होतो. पण आता बाहेरच्या लोकांना असं वाटतंय की जणू काही आमचा वर्षभरापूर्वीच घटस्फोट झाला आहे. लोक वाट्टेल ते तर्कवितर्क लावत आहेत.”















Leave a Reply