‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि विकी कौशल स्टारर ‘छावा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी तरुण अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथील घरात कोणी नसताना संचिताने छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले. लहान बहीण घराबाहेर गेली असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना रविवारी संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या सुमारास घडली. संचिताच्या मृत्यूमुळे बॉलिवूडही हादरलं. तिच्या अंत्यसंस्कारादरम्यानचे काही क्षण व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले असून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. तिचा मृतदेह जमिनीवर ठेवलेला होता आणि तिची आई, बहीण, नातेवाईक शेजारी उभे होते. आपली लाडकी लेक या जगातून गेली, हे त्या माऊलीला पटतंच नव्हतं, ती आई संचिताला सतत हाक मरात होती, उठवत होती.
” ए संचू.. संचिता उठ ना.. मला आई म्हण ना.. ए बबड्या … तू का असं केलं हे ? माझ्यासोबत राहणार होतीस ना तू.. असं का केलं हे ?” रडत रडत, हंबरडा फोडत, संचिताच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, तिच्या आईने विचारलेल्या या प्रश्नांनी तिथलं वातावरण आणखीनच गंभीर झालं. संचिताचा मृतदेह पाहून कोणाचाच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिची आई, बहीण, नातेवाईक यांच्या डोळ्यातीलअश्रूंना खळ नव्हता. तिची आई वारंवार हाका मारून तिला उठवत होती, असं का केली विचारत होती. मात्र संचिता तशीच निपचित होती. या हृदयद्रावक दृश्याने उपस्थितांचे डोळे भरून आले.














