सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारे वाहत आहेत. नक्की कोण जिंकणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी दुरावा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. दरम्यान, दलित पँथर संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दिले आहे.

दलित पँथर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला. दलित पँथर संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दिले आहे.