उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई या मुंबईतील चार लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईत झंझावाती दौरा केला. या सर्व ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल चिन्हा समोरील बटन दाबून लाखोंच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचार सभा व प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

   यामध्ये  उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अमोल भैया किर्तीकर यांच्या प्रचारार्थ अंधेरी येथे प्रचार रॅली काढण्यात आली.

    

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे प्रचार सभा संपन्न झाली.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा संपन्न झाली.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादर येथे प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षातील नेते, पदाधिकारी, शिवसैनिक व इंडिया महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.