बारामती लोकसभा मतदार संघातील इंदारपूर येथे आपलाच उमेदवार निवडणूक येणार यावरून पोस्टर वॉर रंगले असून याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या पूर्वी इंदापुर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता गुलाल आपलाच म्हणत सुनेत्रा पवार यांचे देखील बॅनर झळकले आहेत.

इंदापूर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुप्रिया सुळे या विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी देखील राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार याच विजयी होतील असे म्हणत त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहे. हे दोन्ही बॅनर सध्या चर्चेला विषय ठरले आहेत.

दरम्यान, बारामती तालुक्यात मतदानाचा टक्का यंदा वाढला आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होईल हे ४ जूनला ठरणार आहे. एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांना भोपळा किंवा १ जागा मिळेल असे सांगन्यात आले आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणती असेल या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.