कौन बनेगा करोडपती (KBC) एक असा शो आहे, ज्याने लक्षावधी लोकांची मने काबिज केली आहेत आणि देशभरातल्या कुटुंबांना एकत्र आणले आहे. या शो चा 16 वा सीझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येत आहे आणि यावेळी पुन्हा त्याचे होस्ट असणार आहेत, महानायक अमिताभ बच्चन.

जीवनाचे गहन सत्य सांगणारे आणि अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातले तीन आकर्षक व्हिडिओ या वाहिनीने लॉन्च केले आहेत आणि यातून सुरू केले आहे विचार करण्यास प्रवृत्त करणारे एक अभियान: ‘जिंदगी है. हर मोड पर सवाल पूछेगी. जवाब तो देना होगा.’ हे विचार आपल्या जीवनातील तथ्यामधूनच उद्भवले आहेत. हे तथ्य म्हणजे, आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्या समोर आव्हानात्मक परिस्थिती असते. अशा वेळी आपले जे प्रत्युत्तर असते, त्यातून आपला मार्ग नक्की होत असतो.

या अभियानात काही असामान्य मानवी कथांमधून उदाहरणे मांडली आहेत. आपल्या पत्नीच्या करकीर्दीत मदत करण्यासाठी स्वतःची नोकरी सोडणारा पती, विवाहापेक्षा पर्वतारोहणाच्या आपल्या पॅशनला प्राधान्य देणारी एक तरुणी आणि निवृत्तीनंतर कॅब ड्रायव्हर म्हणून काम करणारा एक बँक मॅनेजर यांसारखी उदाहरणे यात दिली आहेत. या वेधक विषयांमध्ये अशा आव्हानांवर आणि विजयांवर प्रकाश टाकला आहे, ज्यांच्यामुळे आपल्या जीवन प्रवासाची जडण-घडण होते. अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आवाजामुळे या विचारांना एक भावनिक स्पंदन लाभते आणि ते आपल्याला जीवनातील अनपेक्षित चढ-उतारांत आपल्यातील हिंमत आणि आपल्या इच्छाशक्तीची काय ताकद असते, याची जाणीव करून देते.

KBC हा कधीच फक्त एक क्विझ शो नव्हता. त्यात ज्ञान, चिकाटी आणि भारतीय लोकांच्या अदम्य उत्साहाचा गौरव असतो. गेली अनेक वर्षे हा प्रतिष्ठित मंच अनेक लोकांचे जीवन पालटून टाकण्यात, लक्षावधी लोकांना त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या अद्भुत गेम शोचा 16 वा सीझन लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!