kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सनी निम्हण यांच्या नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळवून देण्यासाठी खंबीरपणे मी त्यांच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे शहरात निर्माण केले असून ते प्रगतीच्या दिशेने पुढे अशीच वाटचाल करतील. मी देखील ठरवले आहे की, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळाला पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

स्व.आबा निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचा हरिकीर्तनचा सोहळा संपन्न झाला त्याप्रगंसी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिध्दार्थ शिरोळे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकांचे यारो के यार असे म्हटले जाणारे आबा निम्हण आपल्यातून गेल्यानंतर ज्याप्रकारे सनी निम्हण यांनी त्यांचे कार्य सांभाळले व ते सर्वांचे मदतीने पुढे नेले ही बाब अतिशयं वाखणण्याजोगी व संतोषजनक बाब आहे. वेगवेगळे शिबीर घेऊन सरकारी योजना व त्यातून मदत देखील लोकांपर्यंत त्यांनी पोहचवली. पुणे जिल्हयातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर कॅम्प त्यांनी नुकताच भरवला. गरीबातील गरीबास आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा आणि महागडे ऑपरेशन देखील मोफत करण्याचा प्रयत्न सनी निम्हण यांनी केला. आगामी काळात आपण सर्वजण मिळून आबा निम्हण यांचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करु.
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मी स्वत: देखील ठरवले आहे की सनीच्या पाठीशी उभे राहून त्याच्या नेतृत्वाला योग्य अश्याप्रकारचा वार मिळाला पाहिजे आणि त्याचे नेतृत्व बहरलं पाहिजे हे देवेंद्रजींचे शब्द मोठा आधार देणारे आहे.

याप्रसंगी शिवाजीनगर व परिसरातील विविध पक्षातील अनेक मान्यवर, पै-पाहुणे, आप्तेष्ट उपस्थित होते. दत्ता बहिरट, मनीष आनंद, किशोर शिंदे, पृथ्वीराज सुतार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, अभय सावंत,मुकारी अण्णा अलगुडे, विनोद ओरसे यांच्यासह अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच आबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.