kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी?

बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर व्होटिंग मशिनमध्ये देण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात येईल. बिहार विधानसभा निवडणूक निकाल लागण्याच्या आधीपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे एनडीएकडून पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी उभं केलं जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असताना दुसरीकडे विरोधकांकडून लालू प्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्यात आला आहे.

एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांना पाठबळ उभं करण्यात आळं आहे. याआधी नितीश कुमार यांनी नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून आता दहाव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपा – १०१

जेडीयू – १०१

लोजप(रामविलास पासवान) – २९

राष्ट्रीय लोक मोर्चा – ०६

हिंदुस्तानी आवाम मोर्चा – ०६