kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; संपूर्ण यादी एका क्लिकवर…

बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा 2025आज (14 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सध्या बिहारमधील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.

बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जदयूने 101 जागा लढवल्या. तर भाजपने देखील 101 जागा लढवल्या. एनडीएमधील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) पार्टीने 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चाने 6 जागा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाने 6 जागा लढवल्या.