kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तिजोरीला दुसरी किल्लीही असते; नीलम गोऱ्हेंचा ‘त्या’ विधानावरुन अजित पवारांना चिमटा

तिजोरीची दुसरीही किल्ली असू शकते व ती उघडण्यासाठी वेगळा कोडदेखील असतो. काही तिजोऱ्या फेस रीडिंगनेदेखील उघडता येतात, अशा शब्दांत शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुधवारी टोला लगावला. छत्रपती संभाजीनगरात समर्थनगर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यावेळी उपस्थित होते.

तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे, असे सांगत निवडणुकीतील प्रचारसभेत अजित पवार मतदारांकडे मतांची मागणी करीत आहेत, याकडे पत्रकारांनी गोऱ्हे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा टोला लगावला. तिजोरीला एकच किल्ली नसते, दुसरी किल्लीही असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करण्याची मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. आर्थिक तरतुदीचे कारण सांगून आनंदाचा शिधा बंद करण्यात आला. केवळ वीस कोटी रुपयांसाठी हे करण्यात आले याचा खेद वाटतो, असे त्या म्हणाल्या.