kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

६० व्या वाढदिवशी सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट! ‘बॅटल ऑफ गलवान’ची रिलीज डेट जाहीर

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने शुक्रवारी रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या पार्टीला सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. आज वाढदिवसानिमित्त सलमानने त्याच्या चाहत्यांसाठी खास आनंदाची बातमी शेअर केली आहे.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’चा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘बॅटल ऑफ गलवान’ नेमका कधी प्रदर्शित होणार याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये ‘बॅटल ऑफ गलवान’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

१ मिनिटं १२ सेकंदाच्या टीझरची सुरुवात सलमान खानच्या व्हॉइसओव्हरने होते. लडाखमधील गलवान व्हॅलीच्या सीमेवर भारतीय सैनिक देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात. तर, सलमान खान त्यांना उद्देशून म्हणतो, “सैनिकांनो, जर तुम्ही जखमी झालात तर ते तुम्हाला मिळालेलं मेडल समजा आणि जर तुम्हाला मृत्यू दिसला तर त्याला सलाम करा.” त्यानंतर अभिनेता बिरसा मुंडा की जय, बजरंगबली की जय आणि भारत माता की जय असं म्हणत जयजयकार करतो.

सलमान खान टीझरमध्ये भारतील लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसतोय. त्याच्या डोळ्यात राग आहे, हातात लाकूड आहे तर, समोरून चिनी सैनिक भारतीय सैन्याच्या दिशेने येत असल्याचं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी सलमान खान म्हणतो, “मृत्यूची भीती का बाळगायची? तो येणारच आहे.”

सलमान खानचा हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी १७ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमा ‘धुरंधर पार्ट २’ ला क्लॅश होईल अशा चर्चा होत्या. मात्र, ‘बॅटल ऑफ गलवान’ आता महिन्याभराने म्हणजेच एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट जून २०२० मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. तथापि, चित्रपटाची कथा आणि यामध्ये झळकणाऱ्या कलाकारांबद्दलची फारशी माहिती निर्मात्यांनी समोर आणलेली नाही. यामध्ये चित्रांगदा सिंग सलमान खानबरोबर मुख्य भूमिकेत झळकणार आहे