राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलाहामुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकारावरती रोष व्यक्त करत अभिषेक पाटलांनी तडकाफडकी राजीनामा दिला असून भाजप ऐन वेळी झुलवत असून सर्वांनी आपापले उमेदवारी सेफ ठेवत राष्ट्रवादी पक्षाला डावलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे ला अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली.











