kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची तब्येत बिघडली ; लीलावती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांचा मुलगा सलमान खान लीलावती रुग्णालयात आलेला आणि त्यानं वडिलांची भेट घेतली होती. सलमान खानची बहीण अलविरा खान देखील रुग्णालयात त्यांची भेट घेतली. सलमान व्यतिरिक्त, सलीम खान यांचे जावई अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा देखील रुग्णालयाबाहेर दिसले.

सलीम खान यांना मुंबईतील वांद्रे इथल्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे रुग्णालय त्यांच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळच आहे. पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. लीलावती रुग्णालयाबाहेरील हा व्हिडीओ आहे. ‘सलीम खान लीलावती रुग्णालयात दाखल’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कुटुंबाकडून सलीम खान यांच्याबद्दल अद्याप कोणतेही विधान जारी केललं नाही. सलीम खान रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत असून ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सलमान खान काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसतोय. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि टेन्शन स्पष्टपणे दिसतंय. त्याचबरोबर अतुल अग्निहोत्री देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत.