श्री विठुराया आणि रुक्मिणीच्या गळ्यातही चक्क तिरंगी फुलांच्या माळा परिधान करण्यात आलेले आहे. आज भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना ही मंदिर समितीची एक अनोखी भेट म्हणावी लागणार आहे. देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना देशातील अनेक मोठी मंदिरी आणि धार्मिकस्थळं देखील आकर्षकरित्या सजली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढपूरचे मंदिर देखील सजलं आहे. लागोपाठ आलेल्या सुट्टयांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने तशी तयारी देखील केली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनी आज विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल गाभाऱ्याच्या बाहेर असलेला चौखांबी, सोळखांबी ,रुक्मिणी गाभारा ,नामदेव पायरी ,व्हीआयपी गेट अशा ठिकाणी ही आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तीन रंगी फुलांचा अत्यंत आकर्षक पद्धतीने आणि कल्पकतेने यासाठी वापर करण्यात आला आहे.













