kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! अयोध्येतील श्री राम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज; संशयिताने पाठवले पाकिस्तानातील लोकेशन

अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठवले.

आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवलं. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेजद्वारे सांगितले.