सोशल मीडिया चळवळ ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या समर्थकांचं जंतरमंतरवरील आंदोलन आता संपलं आहे.दुपारी सव्वाचारच्या सुमारास अभिजीत दिपके जंतर मंतर वरून बाहेर पडले. “पुढच्या आंदोलनाबद्दल नेमकं काय करायचं याची माहिती घेतोय.”, असं ते म्हणाले.
भाषणात त्यांनी म्हटलं की, “5 वाजेपर्यंत जर प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर हे आंदोलन देशभर पसरेल.” पुढच्या शनिवारी पुन्हा येणार का असं गर्दीला विचारलं आणि मग गर्दीने जोरदार आवाज केला.
आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “आजचं आंदोलन तर फक्त एक ट्रेलर होतं.”
त्यांनी एक्सवर लिहिलं, “मी माझ्या आई-वडिलांना भेटायला घरी जात आहे, त्यांना शेवटचं भेटून एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. गेल्या 15 दिवसांत त्यांना खूप त्रास झाला आहे आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावं लागलं. आता मी त्यांना पुन्हा घरी घेऊन जाणार आहे. “तुमच्या माहितीसाठी, आजचं आंदोलन फक्त एक ट्रेलर होतं. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद!”
आंदोलनानंतर पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हीडिओ पोस्टमध्ये सौरभ दास म्हणाले, “तुम्हा सर्वांनी पाहिलं की आज जंतरमंतरवर हजारो लोक जमले आणि त्यांनी शांततेत आंदोलन केलं. या सर्व ‘कॉक्रोचेस’चे मनापासून आभार.”
तर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “आज जंतरमंतरवर हजारो लोकांची गर्दी जमल्यानंतरही सरकारकडून आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. पंतप्रधानांनीही अद्याप धर्मेंद्र प्रधानांना पदावरून दूर केलेलं नाही.”
“ज्यांना वाटत आहे की आज फक्त एक आंदोलन होतं, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा फक्त ट्रेलर होता. आम्ही या सरकारला सात दिवसांचा वेळ देत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्यात देशाच्या लोकशाहीबद्दल थोडीशी जरी जबाबदारी वाटत असेल तर त्यांनी सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पदमुक्त करावं. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू.”













Leave a Reply