kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘धुरंधर 2’ लवकरच 1000 कोटींचा गल्ला जमवणार

रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर 2’चा जलवा आता जगभरात पाहायला मिळतोय. या चित्रपटाने सिनेमागृहात एन्ट्री घेताच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड तयार केला. फर्स्ट डे पासून या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचे कलेक्शन पूर्ण केले. आता धुरंधर: द रिव्हेंज हा सिनेमा किती कोटींचा व्यवसाय करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पेड प्रीव्ह्यूमध्ये या चित्रपटाने सिनेमागृहात छप्परफाड कमाई केली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 7 दिवस पूर्ण झाले आहेत. 6 दिवसांत या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला? मंगळवारी या चित्रपटाने किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात.

‘धुरंधर 2’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत 500 कोटींचा आकडा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची सिनेमागृहात फारशी जादू चालली नाही. परंतु, प्रत्येक दिवशी हा सिनेमा 50 कोटींचा आकडा पार करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने मंगळवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 56.55 कोटींचा व्यावसाय केला. एकूण 22,412 शो हे हाऊसफूल होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारची प्रेक्षक उपस्थिती 36.7 टक्के इतकी होती. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 575.67 कोटींचा व्यवसाय केला आहे. मंगळवारी झालेल्या बिझनेसमध्ये आदल्या दिवसाच्या तुलनेत 13 टक्क्यांची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाचे एकूण ग्रोस बॉक्स ऑफिस कलेक्शन 687.43 कोटींवर पोहोचले आहे. तर, नेट कलेक्शन 575.67 कोटींची कमाई केली आहे.

तसेच इतर देशात या सिनेमाने आतापर्यंत 231.57 कोटींचे कलेक्शन केले आहे. जगभरातून या सिनेमाने 6 दिवसांत 919 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 1000 कोटींची कमाई केली, यात काही शंका नाही. दरम्यान, हा सिनेमा कधी हा आकडा पार करेल? भारतात हा सिनेमा 600 कोटींची कमाई कधी करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.