kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘वॉन्टेड गर्ल’ चा चेहरा पाहून चाहत्यांना बसला धक्का !!

‘वॉन्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आयशा टाकियाचा आता लूक खूप बदललेला दिसत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला. ओठांच्या सर्जरीमुळे ती ओळखणे कठीण झाले आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

आयशाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ते सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटात. तिची आणि सलमानची जोडी फार पसंत केली गेली. तेव्हापासूनच तिला ‘वॉन्टेड गर्ल’ हे नाव मिळालं. पण नंतर आयशा बॉलिवूडपासून दूर राहू लागली. नंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं ते तिच्या लूकसाठी. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला. कारण तिने ओठांची सर्जरी केली होती त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे बदलून गेला होता.या लूकमध्ये आयशाला ओळखणेही कठीण झाले होते. त्यानंतर पुन्हा ती कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

आयशा टाकियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये ती निळ्या टॉपमध्ये दिसत आहे. ती सुट्टी एन्जॉय करत असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. हे फोटो शेअर करताना आयशा टाकियाने लिहिले आहे की, “प्रेम आणि प्रकाश” (Love & Light). हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे तर, बऱ्याच जणांनी ट्रोल केलं आहे.

या फोटोंमध्ये आयशा टाकियाला पाहून अनेकांनी ती आधीची आयशा वाटत नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तिचा लूक खूपच बदलला असून चाहत्यांना धक्काच बसला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे “अरे, इतक्या सुंदर मुलीचं तू काय केलेस?” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “तिला इतक्यात काय झाले आहे.” एका वापरकर्त्याने तिला फिल्टर काढण्याचाही सल्ला दिला.”