kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कुंभमेळा: नाशिकच्या तपोवनातली झाडं वाचवायला सामान्य नागरिकांना का रस्त्यावर उतरावं लागलं?

नाशिकमध्ये गोदावरीचा पूल ओलांडून तपोवनात पोहोचलं की मोठी झाडांची गर्दी दिसू लागते. मुख्य रस्ता सोडून एक छोटा पायवाटेसारखा रस्ता आत शिरतो.काही पावलं पुढे गेल्या एक जुनं पुराणवृक्षासारखं वडाचं झाड उभं आहे. त्याच्या असंख्य पारंब्या त्याच्या आयुष्याचा जरासा अंदाज आपल्याला देतात.या वडाच्या पायाशी एक छोटं मंदिर आहे. समोर एक विस्तीर्ण पटांगण झाडांच्या सावलीत उभं आहे. यापंटांगणावर अनेकांची गर्दी आहे. बरेचसे नाशिककर आहेत. कोणी आजूबाजूच्या गावांमधून आले आहेत. काही अगदीकुटुंबासहित आले आहेत. काही शाळकरी मुलं आहेत.काही सोशल मीडिया कन्टेन्ट क्रिएटर्स आहेत, रील्स शूट करत आहेत, काही जण संस्था-संघटनांचे आहेत, काहीजण हातात बोर्डस घेऊन उभे आहेत. झाडं वाचवण्याबद्दलचा संदेश त्यावर लिहिला आहे.काही झाडांच्या बुंध्यांवर ‘मला माराल तर तुम्ही मराल’ असं लिहून फलक गुंडाळले आहेत. कुठं ‘क्यू आर कोड’ छापून तुमचा पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संध्याकाळच्या वेळेस तिथं एक टी-शर्ट विकणाराही येतोज्याच्याकडे झाडांविषयीचे संदेश देणारे टी-शर्ट्स आहेत.

नाशिकच्या या तपोवनात एक माहोल तयार झाला आहे. काहीही झालं तरीही झाडं वाचवण्याचा माहोल. पार्श्वभूमीआहे तपोवनातली काही झाडं तोडली जाण्याच्या शक्यतेची. जेव्हापासून ही बातमी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, तेव्हापासून हे ऐतिहासिक तपोवन संघर्षाचं ठिकाण बनलं आहे. नागरिक आणि सरकारचा संघर्ष.

हा संघर्ष या वनातली झाडं वाचवण्यासाठी आहे. पुढे नेमकं काय होणार या प्रश्नाबद्दल अजूनही संदिग्धता आहे. पण बघता बघता नाशिकच्या तपोवनाची बातमी देशभर पोहोचली आहे.

साधारण पंधरवड्यापासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यात एका तरुणाचा एक व्हीडिओ होता, ज्यात जुन्या चिंचेच्या वृक्षावर चढून काही सांगतो आहे. तो सांगतो आहे या तपोवनातल्या झाडांच्या होणाऱ्या संभाव्य कत्तलीबद्दल.
ही झाडं का तोडली जाऊ शकतात हे तो पोटतिडकीनं सांगतो. ते थांबवायला पाहिजे असंही सांगतो. तो व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर ही बातमी सर्वत्र चर्चेचा विषय बनली.

त्या व्हिडिओतल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली आम्हाला रोशन केदार भेटतो. तपोवनातल्या झाडांसाठी झगडणाऱ्या नाशिकच्या अनेक तरुणांपैकी तो एक आहे.

“या चिंचेच्या झाडावरही फुली मारलेली होती. त्या दिवशी हरकती घेण्याचा सेकंड लास्ट दिवस होता. मला वाटलं कीहे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग आम्हाला जे जमतं ते आम्ही केलं. झाडावर चढलो आणि एक व्हिडिओकेला. आणि तो लोकांपर्यंत पोहोचला,” रोशन सांगतो. त्याच्या हातात एक निळी फाईल आहे. त्यातले सगळे कागददाखवत काय काय झालं हे समजावतो.

नाशिकच्या तपोवनाचा प्रश्न हा जवळपास 1,800 झाडांचा आहे. तपोवनाच्या या परिसराला एक धार्मिक महत्व आहे. रामायणातल्या उल्लेखांनी तर नाशिक परिसरातल्या अनेक जागा भरलेल्या आहेत. त्याशिवाय दडकारण्याचा प्रांतमानलेला हा भाग इतरही अनेक पौराणिक आणि धार्मिक कारणांसाठी पवित्र मानला जातो. तपोवन ही अशीच जागा. गोदावरीच्या काठानं दोन्ही बाजूंना पसरलेला हा दाट वनराजीचा प्रदेश.

दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याला देशभरातून येणाऱ्या विविध आखाड्यांच्या साधूंसाठी साधुग्राम उभारलंजातं. ते तपोवनाच्या परिसरातच उभारलं जातं. आजही इथं अनेक आखाडे, त्यांचे मठ, मंदिर या परिसरात आहेत. यासाधुग्रामसाठी तीनशे-साडेतीनशे एकर जागा लागते. इथली मोकळी जागा, शेतजमिनी असं सारं घेऊन महापालिका हेसाधुग्राम उभारत असते.

त्याच तपोवनातल्या आता गोदातीराजवळ असलेल्या साधारण 54 एकर दाट वृक्षराजीतल्या झाडांवर जेव्हा खुणा(काही ठिकाणी फुल्या आहेत, तर काहींवर बरोबरची खूण आहे) झालेल्या नागरिकांनी पाहिल्या, तेव्हा शंका बळावल्या आणि लवकरच त्या संतापात रुपांतरित झाल्या.