बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्राँग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात २ लाख २४ हजार मतदान झाले, त्यापैकी दोन लाख वीस हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल, असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
विलीनीकरण व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती, आजही आहे. उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा त्यांना सोडावे लागले, तर ते पुन्हा महाविकास आघाडीसोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ शकतात. पूर्वी लोकांना वाटायचे की, काहीही झाले तरी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊच शकत नाहीत. हे शक्यच नाही. पण, ते आले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सरकारही चालवले, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. २०२९ ला आमदार कोण होणार, हे बारामतीकर ठरवतील. कार्यकर्ते असतील, बारामतीची जनता असेल, शेवटी पवार साहेब ठरवतील, ताई ठरवतील, आमच्या कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य बसतील आणि जर सगळ्यांची इच्छा असेल, लोकांची इच्छा असेल आणि कुठेही पवार विरुद्ध पवार न होता एकमताने सर्वांचे भले होणार असेल, तर मग का नको, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित दादांच्या विमान अपघातात संदर्भात आमचे म्हणणे एवढेच आहे की, सत्य समोर आले पाहिजे. पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको हे म्हणणे आहे. याआधी बोललो आहे, जय बोलला आहे. सुप्रियाताईंचे वक्तव्य ऐकले. सुनेत्राकाकी बोलल्या आहेत. आम्ही कुटुंब म्हणून एक असले पाहिजे, पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हायला नको, असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले.













Leave a Reply