kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुलुंड मेट्रो दुर्घटना: दोषी कंपनीला ५ कोटींचा दंड; मृतांच्या वारसांना १५ लाखांची मदत – एकनाथ शिंदे

मुलुंड येथे मेट्रो प्रकल्पादरम्यान झालेल्या दुर्घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीला ५ कोटी रुपयांचा तर संबंधित सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मृत व्यक्तीच्या वारसांना MMRDA कडून १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च MMRDA उचलणार आहे. तसेच एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांचे तातडीने स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले.