गिरिजा ओक ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी , हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तिची स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली आहे. यामागे तिची अनेक वर्षांची मेहनत आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक हिंदी जाहिरातीही केल्या आहेत. तिच्या अभिनयासोबतच चाहते तिच्या सिंपल, साध्या लूकच्या आणि सौंदर्याच्या नेहमीच प्रेमात असतात. गिरिजाच्या साडीच्या व्हिडीओनंतर किंवा तिच्या पोडकास्टमधील क्लिप्सनंतर आता तिचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गिरिजाचा मार्केटमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे. सिंपल घरातील कपडे, नो मेकअप अशा साध्या-सिंपल लूकमध्ये ती भाजी खरेदी करायला गेलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती एक चोखंदळ व्यक्ती आहे हे देखील दिसत आहे.कारण ती चांगली, ताजी भाजी कोणती आहे हे निवडून घेताना दिसत आहे. तसेच तिच्या हातात अनेक पिशव्या देखील दिसत आहेत.”
दरम्यान गिरिजाने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “घर का खाना…” तसेच गिरिजाने पोस्टमध्ये 2 फोटोही शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती क्यूट स्माइल देताना दिसत आहे. असे वाटत आहे. जेवून तिचे मन तृप्त झाले आहे. तर दुसऱ्या फोटोत पंचपक्वानाचे ताट दिसत आहे. यात भात, डाळ, भाजी, अळूवडी आणि दोन चटण्या पाहायला मिळत आहे. तर व्हिडीओमध्ये गिरिजा बाजारात भाजी खरेदी करताना दिसत आहे. गिरिजाने या पोस्टला हे खास कॅप्शन दिलं आहे.











