महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (6 मार्च 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित असल्याचं म्हटलं. तसेच अजितदादांचं स्मारक उभारण्यात येणार असून अजित पवारांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांवर एक नजर टाकुयात…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आम्ही आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पिककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद करणार आहे. भरीव निधीची तरतूद करुन ही योजना अधिक सक्षमपणे राबवण्याचा संकल्प केला.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणा
आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित
अजितदादांचं स्मारक उभारण्यात येणार
अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारणार
अजित पवारांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार
2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेणार
गडचिरोलीमध्ये स्टील उद्योगात 70 हजारांहून अधिक रोजगार
मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष
तिसरी चित्रनगरी नागपूरच्या रामटेकमध्ये सुरू करणार
5 ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यासाठी तरतूद
महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास
राज्यातील पाणंद रस्त्यांना मान्यता
प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म आणि लघू केंद्र स्थापन करणार
नवी मुबंई विमानतळाजवळचं क्षेत्र ग्रीनफील्ड म्हणून घोषित
अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार
मुंबई, पुणे, नागपूरमध्ये 490 किमीचे मेट्रो मार्ग
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो मार्ग
दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचं काम प्रगतीपथावर
ठाणे ते नवी मुंबई उन्नत रस्ता
गायमुख ते फाऊंटन हॉटेल भूमिगत आणि उन्नत रस्ता
वाढवण बंदरासाठी उत्तन ते विरार द्रुतगती मार्ग
उलवे सागरी किनारा मार्ग यावर्षी पूर्ण होणार
पुणे मेट्रो टप्पा 2 ला मान्यता
शिरुर - संभाजीनगर ग्रीन फील्ड महामार्गाला मान्यता
पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरण
लातूर, बारामती, अमरावती नाईट लँडिंगची सुविधा
1 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत काँक्रिट रस्ता
वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणार
वाढवण बंदरासाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने देणार
वाढवण बंदराद्वारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार
सातपाटीत आधुनिक मस्त्यबंदर उभारणार
एमएमआरमध्ये जलवाहतुकीचे जाळं वाढवणार
जहाज बांधणी क्लस्टरसाठी आवश्यक निधी देणार
मुख्यमंत्री बळीराजा योजनेच्या अंतर्गत 100 टक्के वीज बिल सवलत
2027 मध्येही मुख्यमंत्री बळीराजा योजना सुरू राहणार
मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या अंतर्गत 6 लाखांहून अधिक पंप
सौर कृषीपंप योजनेची गिनीज बुकात नोंद
शेतकरी कर्जमाफी जाहीर
महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर राज्यातील शेतकऱ्यांना पीकसल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे.
राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' सुरु करत आहोत...
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, निती आयोगाच्या निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्राला प्रथम स्थान.
30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी देणारी ही योजना असणार आहे.
पुणे हे GCC साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे.
वडाळ्यात 130 एकर जमीन स्टार्ट अप आणि इनोव्हेशन हबसाठी वाटप करण्यात आली, पंढरपूर विकासाच्या टप्प्याची कामे प्रगतीपथावर
मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत यासाठी 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क' विकसित करण्यात येणार.
राज्यात 2047 पर्यंत प्रवासी आणि मालवाहतुकीकरिता सलग संपर्क जाळे तयार करण्यासाठी हवाई, भुयारी आणि मेट्रोचे जाळे राज्यभर पसरवणार.
ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलदगतीने काम करण्याकरिता ही योजना काम करणार
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांवर रूफटॉप सोलार लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साधणार.
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल.
विमान व जलवाहतुकीचे विस्तारीकरण सुनिश्चित करणारे विविध प्रकल्प तसेच आधुनिक मत्स्यबंदर उभारण्यात येणार..















