अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारातमीकडे रवाना झाले होते. मात्र, लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले. पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला.
डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.
Maharashtra Deputy CM Ajit Pawar, 3 others on board dead after aircraft crashes in Pune district: Official
— Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026















