kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“ती नक्की लेस्बियन आहे!”; कुनिकाचे थेट मालती चहरच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह

बिग बॉस 19 सुरू झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या शोमध्ये कलाकार स्पर्धक अनेकदा वेगवेगळे दावे, आरोप- प्रत्योरोप करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा होते. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंदने मालती चहरबद्दल एक असा दावा केला आहे ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका टास्क दरम्यान तान्या मित्तलने कुनिकाला सांगितले की ती मालतीवर खूप निराश आहे तिथूनच हे प्रकरण सुरू झाले.

शोमध्ये तान्या म्हणाली की, मालतीने तिला प्लेटने मारण्याचा प्रयत्न केला. तान्या तिचा राग व्यक्त करत असताना, कुनिका म्हणाली की तिला मालती लेस्बियन असल्याचा संशय आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. मालती चहरचे चाहतेही प्रचंड नाराज झाले आहेत. या प्रकारामुळे कुनिका सदानंद ट्रोलर्सच्या रोषाच्या निशाण्यारव आहे.

तान्या मित्तलशी बोलताना कुनिका म्हणाली, “मला एक गोष्ट सांगायची आहे, मला पूर्ण खात्री आहे की मालती मॅडम आहे ना ती लेस्बियन आहे.” तान्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तरी कुनिका त्याबद्दल बोलत राहिली. कुनिका म्हणाली, “तिची देहबोली देखील तशीच दिसते आणि ती ज्या पद्धतीने बोलत राहते. याकडे लक्ष दे.” कुनिका सदानंदच्या या विधानासाठी तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

कुनिका सदानंद आता तिच्या विधानामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. एका युजरने कमेंट केली की, “नॅशनल टेलिव्हिजनवर एखाद्याच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे चुकीचे आहे. कुनिकाला लाज वाटली पाहिजे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “आता, वीकेंड का वॉरमध्ये, ती काय म्हणत आहे ते तिला समजेल.” दरम्यान, काही युजर्सने तान्याचा बचाव करताना म्हटले की, तिने संभाषणात काहीही चुकीचे केले नाही आणि भविष्यात तिला विनाकारण लक्ष्य केले जाऊ नये. एका युजरने लिहिले की, “आता तान्याला दोष देऊ नका; ती यात सहभागी नव्हती.”