kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्राला हिरवे करणार म्हणणाऱ्यांनी औरंगजेबाची कबर पाहावी- मंत्री नितेश राणे

प्रकरण नक्की काय?

मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांनी माफी मागितल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर, एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जात सहर शेखच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत सांगितले की, केवळ मुंब्राच नव्हे तर येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू.