लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबईत महायुतीचा विजय झाला आहे. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल विरुद्ध भूषण पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, वायव्य मुंबईत रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा यांच्यात लढत झाली.

मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला

-उत्तर मुंबईत पियूष गोयल यांचा विजय
-दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंचा विजय
-दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांचा विजय
-वायव्य मुंबईत रवींद्र वायकर यांचा विजय
-उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय
-ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांचा विजय