kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गुढीपाडव्यानिमित्त हिरव्यासाडीत गौतमी पाटीलचं फोटोशूट

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठमोळ्या साजात साजरी होणारी परंपरा, संस्कृती आणि सौंदर्य यांचा अप्रतिम संगम यंदा विशेष चर्चेत आला आहे, कारण प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या खास फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरव्या नऊवारी साडीतला तिचा लूक, त्यावर जड एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज आणि पारंपरिक दागिन्यांची जोड या सगळ्यामुळे ती अक्षरशः “सबसे कातील” दिसत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारली जाते, नवीन सुरुवातींचं स्वागत केलं जातं आणि पारंपरिक वेशभूषेत लोक सण साजरा करतात.या सुंदर लुकमुळे गौतमी खूपच चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :- @official_gautami941__, @design_phactory)

गौतमीने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती, ज्यामुळे ती अगदी पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात दिसत होती. साडीची खास नेसण्याची स्टाइल तिच्या व्यक्तिमत्त्वाला अजून उठाव देत होती. तिने साडीसोबत जड एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज घातला होता, ज्यामुळे तिच्या लूकला थोडासा आधुनिक टच मिळाला. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा हा छान मिलाफ तिच्या लूकमध्ये दिसून येत होता. यावर्षी तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता.

या फोटोमध्ये गौतमीने हिने हिरव्या साडीवर खूप सुंदर आणि पारंपरिक दागिने घातले आहेत. तिचा दागिन्यांचा साज अगदी उठून दिसतो. तिने गळ्यात जड आणि नक्षीदार असा सोन्याचा हार घातला आहे, ज्यामुळे तिचा लूक खूप रॉयल दिसतो. त्यावर रंगीत स्टोनची डिझाईन असल्यामुळे हार आणखी आकर्षक वाटतो. नाकात मोठी आणि सुंदर नथ आहे, जी मराठमोळ्या लूकची खास ओळख आहे. या नथीमुळे तिचा चेहरा अजून खुलून दिसतो.

गौतमी पाटील हिच्या या गुढीपाडव्याच्या लूकमध्ये नथीने खरंच चार चाँद लावले आहेत. हिरव्या साडीवर तिने घातलेली मोठी आणि आकर्षक नथ तिच्या संपूर्ण लूकचा हायलाइट ठरते. मराठमोळ्या साजात नथ ही खूप महत्त्वाची मानली जाते, आणि गौतमीने ती अगदी योग्य पद्धतीने कॅरी केली आहे.

गौतमी पाटील हिचा या फोटोमधील मेकअप खूपच साधा दिसतो. तिने खूप हेवी मेकअप न करता हलका बेस ठेवला आहे, त्यामुळे तिची त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग दिसते. डोळ्यांना हलकासा आयशॅडो आणि आयलाइनर लावून ते उठावदार केले आहेत. ओठांवर तिने साडीला मॅच होईल असा सॉफ्ट आणि नैसर्गिक रंगाचा लिपस्टिक वापरला आहे. गालांवर हलका ब्लश असल्यामुळे तिचा चेहरा फ्रेश आणि आकर्षक दिसतो.