kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! रशियानंतर तुर्कीकडून 30 दिवसांत 52 टन सोन्याची विक्री

सुवर्ण बाजारात सध्या तुर्की चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असलेल्या तुर्कीला अचानक 30 दिवसांत म्हणजे एका महिन्यात 52 टन सोने विकण्यास भाग पडले आहे. तुर्कीने केवळ आर्थिक नव्हे तर एका सक्तीमुळे सोनं विकलं आहे. घसरणारे चलन, वाढती महागाई आणि कमी होणारी परकीय गंगाजळी यामुळे तुर्कीला आपल्या जवळील सर्वात सुरक्षित साठाही विकणं भाग पडलं आहे. तुर्कीकडून केलेल्या या विक्रीचा परिणाम सुवर्ण बाजारावर स्पष्ट दिसून आला आणि गेल्या महिन्यात सोन्याच्या किमती अंदाजे 11.5% घसरल्या, जी 2008 नंतरची सर्वात मोठी मासिक घसरण ठरली.

गेल्या काही वर्षांपासून तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं होतं, जे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचा एक भक्कम पाया मानले जात होते. पण नंतर परिस्थिती हळूहळू वेगळं वळण घेऊ लागली. सर्वात आधी चलनावर दबाव आला आणि तुर्की lira सातत्याने कमजोर होऊ लागले.

एखादा देश आपलं चलन सांभाळण्यात अपयशी ठरतं तेव्हा त्यांना डॉलरची गरज पडते, जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कर्ज फेडले जाऊ शकेल. पण तुर्कीची अडचण म्हणजे की त्यांच्याकडे डॉलर कमी आणि सोनं भरपूर प्रमाणात होतं. म्हणजे त्यांना डॉलरची गरज होती, पण त्यांच्याकडे सोनं होतं. अशा परिस्थितीत, तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेसमोर फक्त एकच पर्याय – सोने विकून डॉलर उभे करणे उरला होता.

याच दबावाखाली, तुर्कीने 27 फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान 52 टन सोनं विकलं. इतकेच नाही तर गोल्ड स्वॅपद्वारे अंदाजे 79 टन सोने बाजारात आणले म्हणजेच सोने उधार देऊन डॉलर मिळवले गेले. इतकेच नाही तर गोल्ड स्वॅपद्वारे अंदाजे 79 टन सोने बाजारात आणले म्हणजेच सोने उधार देऊन डॉलर मिळवले तर, केवळ केवळ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच अंदाजे 31 टन सोने बाजारात आणले गेले ज्यामुळे सोन्याच्या या मोठ्या पुरवठ्यामुळे किमतींवर प्रचंड दबाव आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *