स्पेनच्या सीमेवरील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. याचं कारण शेजारील मोरोक्कोमधून हजारो नागरिकांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडत देशात प्रवेश केला आहे. मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना किमान अनेक स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. सीमेवरील स्पेनच्या स्युटा येथील संकटकाळात मृतांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे, अशी माहिती स्पॅनिश सरकारनं शनिवारी दिली. यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांचा आणि लाटांपासून संरक्षण करणाऱ्या भिंतीवरून (ब्रेकवॉटर बॅरियर) पलीकडे जाण्याच्या धडपडीत चेंगराचेंगरीमुळं मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे.
जमीन आणि समुद्रमार्गे स्यूटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं याठिकाणी अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत 60 हजार स्थलांतरितांनी स्पेनच्या या छोट्याशा प्रदेशाची सीमा ओलांडल्यानंतर स्पेननं समुद्रातील लाटांपासून संरक्षण करणाऱ्या भिंतीच्या (ब्रेकवॉटर) बाजूनं 500 मीटर लांबीचा अडथळा उभारण्याची घोषणा केली. शनिवारी सकाळी पोहून स्यूटा येथील ‘ताराजल’ समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलेल्या काही थकलेल्या स्थलांतरितांना तेथील सैनिकांनी सीमा ओलांडून परत पाठवलं. उत्तर आफ्रिकेतील स्पॅनिश प्रदेशात प्रवेश केलेल्यांपैकी बहुतांश लोक आधीच मोरोक्कोला परतले आहेत, असं स्पेनच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
स्पेनमध्ये चांगल्या आयुष्याची आशा बाळगणाऱ्या लोकांच्या गर्दीनं रस्ते फुलून गेल्यामुळं आणि काही दिवस चाललेल्या गोंधळानंतर शनिवारी स्युटा शहरात एक अस्वस्थ शांतता पसरलेली दिसून आली. असं असलं तरी 84 हजार लोकसंख्या असलेल्या या स्वायत्त शहरातील रहिवाशांची सुरक्षिततेची भावना मात्र ढळलेलीच होती. “सीमाभागातील घटनेमुळं या शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे,” असं स्युटाचे अध्यक्ष जुआन जीझस विवास यांनी म्हटलं आहे. तसंच “लोकांचं परतणे समाधानकारकपणे सुरू झालं आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. शहरातील परिस्थिती अजूनही पूर्ववत झालेली नाही,” असंही जुआन जीझस विवास यांनी सांगितलं.















Leave a Reply