इराणसोबत वाढत्या संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला करणार असल्याचा इशारा दिला होता. अमेरिकेची इराणवर हल्ला करण्यासाठी तयारीही झाली होती. मात्र आता ट्रम्प यांनी हल्ला करण्याचा निर्णय बदलला आहे. इराणवर सध्या तरी हल्ला करणार नसल्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी वर्ल्ड वॉर-2 प्रमाणे तयारी करण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी अखेरच्या क्षणी हल्ला करणार नसल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली.
ट्रम्प यांनी अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या लष्करी सामर्थ्यानं इराणवर हल्ला चढवण्यासाठी तयार असल्याचा दावा केला होता. मात्र इराण आणि मध्य-पूर्वेकडील इतर देशांनी विनंती केली. या विनंतीनंतर हा हल्ला सध्या रद्द करण्यात आला आहे.
“अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही न पाहिलेल्या लष्करी सामर्थ्यासह सज्ज आहे. मात्र एका कराराच्या रूपरेषेवर सहमती झालीय. त्यामुळे आम्हाला इराण आणि मध्य पूर्वेकडील देशांनी हल्ला न करण्याबाबत आग्रह केला” अशी माहिती ट्रम्प यांनी ट्रूथद्वारे दिली.
ट्रम्प यांनी या करारात समाविष्ठ असलेल्या मुद्द्यांबाबत सांगितलं. या करारात होर्मुझ तात्काळ पुन्हा उघडण्याचा आणि इराणचा आण्विक धोका नाहीसा करण्याचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच इराणवरील हल्ला थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मात्र करार लवकरात लवकर निश्चित झाल्यासच पूर्णपणे हल्ले थांबवण्यात येतील, असंही ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटलं.















Leave a Reply