देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज आहेत. अनंत-राधिकाच्या क्रूज पार्टीसाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून आलिया भट्ट , रणबीर कपूरपर्यंत अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.

एअरपोर्टवर सर्वात आधी रणबीर कपूर, आलिया भट्ट आपली लेक राहासोबत स्पॉट झाले. आलिया आणि रणबीर अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. यंदा अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगला ते लेक राहासोबत हजेरी लावणार आहेत. रणबीर, आलिया आणि राहासोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचे खास मित्र अयान मुखर्जीदेखील दिसून आले. बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मुंबईतील एका प्रायव्हेट एअरपोर्टवर इटलीला जाण्याआधी स्पॉट करण्यात आलं. फोटोमध्ये रणवीर एका नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसून आला. त्याने मॅचिंग स्वेटशर्ट आणि राखाडी रंगाचे जॉगर्स परिधान केले होते. तर आलिया भट्टनेही कॅज्युअल लूक केला होता. तसेच तिने आपले केस बांधले होते. राहासोबत ती आपल्या आलिशान गाडीतून बाहेर पडताना दिसून आली. पुढे रणबीरने आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेतलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं दुसरं प्री-वेडिंग 28 ते 30 मे दरम्यान पार पडणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सलमानलादेखील एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये भाईजान खूपच हँडसम दिसत होता. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला

क्रिकेटर एमएस धोनी आपली लेक जीवा आणि पत्नी साक्षी धोनीसह अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला रवाना झाला आहे. धोनीला सहकुटुंब एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. रणवीर सिंहदेखील रवाना झाला आहे. पांढरा टी-शर्ट, ब्लॅक लॉन्ग जॅकेट आणि ब्लॅक ट्रॉउजरमध्ये त्याला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी सध्या प्रत्येकजण उत्सुक आहे. गुजरातमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनला आतंरराष्ट्रीय गायिका रेहानासह दिलजीत दोसांझ, सलमान, शाहरुख आणि आमिर खानसह अनेक कलाकार सहभागी झाले होते. आता अनंत-राधिकाच्या प्रे-वेडिंगला शकीराचा परफॉर्मन्स असू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील प्री-वेडिंगला परफॉर्म करताना दिसतील.