kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ उद्यापासून नाशिक, अहिल्यानगरमध्ये;आमदार शिवाजीराव गर्जे यांची माहिती…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची जनसन्मान यात्रा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हयात दिनांक २८,२९ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेश कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

रविवार दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११ ते १२ नाशिक जिल्हा कार्यकारिणी व फ्रंटलच्या प्रमुखांची बैठक, १२.३० ते १.३० वाजता देवळाली येथे आमदार सरोज अहिरे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, दुपारी २.३० ते ३.३० वाजता सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता अहिल्यानगर – कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक,सायंकाळी ६ ते ८ येवला येथे मंत्री छगन भुजबळ व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, तर सोमवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी १० ते ११ वाजता निफाड येथे आमदार दिलीप बनकर व समन्वयकांसोबत बैठक, दुपारी १२.३० ते १.३० वाजता विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ व समन्वयकांसोबत बैठक होणार आहे.

या जनसन्मान यात्रेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यासमवेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, तसेच ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.