अखेर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून दीपिकाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू होती. दीपिका कधी आई होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. दीपिका आणि रणवीर दोघं देखील पहिल्यांदा आई-बाबा होण्यासाठी खूप उत्सुक होते. अशातच आता दीपिका आई झाल्याचं समोर आलं आहे. दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी, आज अभिनेत्री गोंडस मुलीला जन्म दिला आहे, असं वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिलं आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणला काल, गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळ पाचच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं. यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आज दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचं समोर आलं आहे. अद्याप दीपिका किंवा रणवीरने याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.