Breaking News

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश ;कुस्तीगीर संघटनेच्या पैलवानांनी हाती बांधले घड्याळ..

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काल प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तर सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेतील विविध पक्षातील नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा अ‍ॅड. वसुधा कुंभार, सांगली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्षा रुकसाना कादरी, मिरजच्या नगरसेविका स्वातीताई पारधी, नगरसेविका राणी मोरे, सां.मि.कु. महानगरपालिकेचे माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कुपवाड विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष प्रवीण बाबर, सांगली शहर युवक उपाध्यक्ष दयानंद टोवळे, संघटक विधानसभा क्षेत्र प्रसाद पाटील आदींचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते