kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली,महाविकास आघाडीचा विजय निश्चित! -दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे. केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघच नव्हे, तर साऱ्या राज्यात व देशात जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. नुसती आश्वासने देणाऱ्या व विकास न करणाऱ्या भाजपाला जनता आता कंटाळली आहे. नागरिकांना महागाई नको असून, जलद विकास हवा आहे. त्यामुळेच महायुतीबाबत भ्रमनिरास झालेली जनता महाविकास आघाडीकडे आशेने बघत आहे. त्यामुळेच या निवडणुकीत २० नोव्हेंबर रोजी परिवर्तन निश्चित होणार असून, शिवाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माझ्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास निश्चित आशीर्वाद देईल व विजयी करेल,असे प्रतिपादन महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, आम आदमी पार्टी व मित्रपक्षाचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी केले.

दीप बंगला चौक येथील त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक विमल चुडासामा, निरीक्षक जगदीश ठाकुर, अॅड. अंकुश काकडे, दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, श्रीकांत पाटील, आनंद मंजाळकर, राजेंद्र भुतडा, उमेश वाघ, राजू साने, तेजिंदरसिंग अहलुवालिया, रफिक शेख, विनोद रणपिसे, राजन नायर, मनीषा ओव्हाळ, ज्योती परदेशी, कल्पना शंभरकर, महेश पवार, रमेश पवळे, सूरज जाधव, रवींद्र कांबऴे (गवई गट), विशाल जाधव, अजित थेरे, गणेश लालबेकी आदींसह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी अॅड. अंकुश काकडे म्हणाले की, यंदाची निवडणूक अत्यंत महत्ताची असून, महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले आहे. महायुतीच्या सरकारकडून आता जनतेला काहीही अपेक्षा राहिलेल्या नसून, यंदा जनता महायुतीला पराभूत करून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला विक्रमी मतांनी विजयी करेल. शिवाजीनगर मतदारसंघात दत्ता बहिरटांसारखा अनुभवी उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होऊन नवा इतिहास घडवेल, असे अंकुश काकडे म्हणाले.

याप्रसंगी निरीक्षक विमल चुडासामा, निरीक्षक जगदीश ठाकुर, अॅड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी आदींनी मार्गदर्शन केले.