kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आजपासून चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे आजपासून चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंत संत एकनाथ रंगमंदिर येथे छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १ वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी ३.३० वाजता पक्ष कार्यालयात जालना जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर भवन येथे हिंगोली जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद, १२.३० वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, सायंकाळी ४ ते ५. ३० वाजता अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, ६ वाजता पत्रकार परिषद, दिनांक २० जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद, १२.३० वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी ३.३० ते ६ वाजता कस्तुराई मंगल कार्यालयात लातूर शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद, ६.३० ते ७ वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, १२.३० वाजता पत्रकार परिषद, दुपारी ३ ते ५ वाजता हेरिटेज हॉल गांधीनगर येथे सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ५ वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आदी.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.