बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणावर आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. मोठ्या प्रमाणात या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 196 जणांची विचारणा केली आहे. तसेच 83 साक्षीदारांकडे तपास केले आहे. तर 286 लोकांकडे मोबाईलद्वारे तपासणी केल्याचे फडणवीस म्हणाले. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
खुल्या मैदानात हल्ला झाला, त्यामुळं साक्षीदार सापडला नाही. एक महिला दीड महिन्यांनी पुढे आल्याचे फडणवीस म्हणाले. महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आक्रोश मी समजू शकतो. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जलील शेख हत्या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांनी केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते मनसेचे कार्यकर्ते होते. नजीब मुल्ला यांनी कारस्थान रचल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. यातील 9 आरोपी निश्चित झाले आहेत, यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत. याप्रकरणी पुरावे पुन्हा पडताळणार असून, पुन्हा या प्रकरणी चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला 16 महिने उलटून गेले, तरीही आरोपी मोकाटच आहेत. पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मुंडे कुटुंबीयांची आहे.
पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास बंद केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणा करत असून महिनाभरात न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पहिले राज्य असेल जे शेतकऱ्यांना हरीत वीज देईल असे मुख्यमंत्री म्हणाले. वीज खरेदीमध्ये आम्ही 10 हजार कोटी वाचवू. राज्याच्या शास्वत विकासासाठी आपण ब्लु प्रिंट तयार केली आहे. 50 टक्के वीज हरीत सोर्सच्या माध्यमातून आपण तयार करत असल्याचे मुख्यमंत्रकी म्हणाले. पुढच्या पाच वर्षात आपण विजेचे दर कमी केलेले आहे. आपण 9.20 टक्क्याने विजेचे दर वाढ़वायचो पण आता दरवर्षी दर कमी होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. 30 लाख कुटुंबाना विजेचे बिल येणार नाही. घरगुती विजेचा वापर करणाऱ्याला आपण सोलर मुक्ती देऊ असेही ते म्हणाले.














