ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘लालबागचा राजा’ साठी ११ लाख रुपये दान केल्याची माहिती समोर आलीय. अकीकडे त्यांचे फॅन्स कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे, सोशल मीडिया युजर्स यांनी पंजाबचा विषय छेडला आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात. रिपोर्टनुसार, यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या मंडळासाठी ११ लाख रुपये दिले आहेत. त्यांनी आपल्या टीमकडून हे पैसे पाठवले आहेत. लालबागचा राजाचे ट्रस्टींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ११ लाखांच्या दानाने भक्तांची मनं जिंकली तरी सोशल मीडियावर मात्र त्याबाबत नव्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे.
काही जण बिग बींना पंजाब पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सांगत आहेत. एकाने लिहिले, पंजाबसाठी दान दिला असता तर खूप आनंद झाला असता. आणखी एकाने लिहिले, पंजाबच्या मदतीसाठी तुम्हाला डोनेशन द्यायला हवं. दुसऱ्या युजरने लिहिले-जर पूरग्रस्तांना मदत केली असती किंवा एखादे गाव दत्तक घेतलं असतं तर थेट पैसे गणपती बाप्पांकडेच गेले असते.
दरम्यान, आयपीएल फ्रेंचायजी पंजाब किंग्सची मालकीण प्रीती जिंटाने जवळपास ३४ लाख रुपयांचे मदतीची घोषणा केलीय. इतकचं नाही तर ती क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवत आहे.












