kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सर्व विकास कामाच्या जोरावर, विकसाच्या ताकदीवर महायुतीच मुंबईत सत्तेवर येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्व विकास कामाच्या जोरावर, विकसाच्या ताकदीवर महायुतीच मुंबईत सत्तेवर येईल. महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. आम्ही लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आहे. महापालिका,स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली.

यावेळी पत्रकारांनी त्यांना ठाकरे गटाचा महापौर बसेल असं बोललं जातय यावर विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “त्यांच्या बरोबर दुसरं कोणीच नाही वाटतं. महाविकास आघाडी तुटलेली आहे असं वाटतं. आता जे सुरु आहे ते तुटलेले आहे का? ते एकटेच आहेत. मी अतिशोयक्ती करणार नाही, पण त्यांची जागा BEST ल्या छोट्याशा निवडणुकीने दाखवून दिली. त्यातून बोध घेतला पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी आपल्याला खात्रीशीरपणे सांगतो आणि मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय रस्ते असेल, मेट्रो, वैद्यकीय सुविधा, फ्लयाओव्हर, स्वच्छता असेल, कारशेडचा विषय हे सर्व विषय मार्गी लावलेले आहेत” असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी क्लस्टर धोरण राबवतोय.जी प्राधिकरण आहेत, एमएसआरडीसी, एमआयडीसी, बीएमसी या सगळ्यांना घेऊन रखडलेले प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून पूनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईबाहेर गेलेले लोक मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“त्यामुळे या सर्व विकास कामाच्या जोरावर, विकसाच्या ताकदीवर महायुतीच मुंबईत सत्तेवर येईल. महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. आम्ही लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आहे. महापालिका,स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की …
“अरे संज्या, भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांच नाव घेण्याची तुझी लायकी आहे का, तुझी योग्यता काय आहे?. आज तुला या भाषेत, माझं मीडियाला आवाहन आहे, कि तुम्ही या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा,भुंकणाऱ्या कुत्र्या तुझी योग्यता आहे का? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशा कशातून वाचवलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो, आनंद दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे यांना पितृतुल्य मानायचे,आनंद दिघे साहेब सुद्धा बाळासाहेबांना सगळ्यात लाडका शिष्य म्हणून त्यांना मानायचे” असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले.