kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राघव – परिणितीचा दिवाळीचा आनंद डबल

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांची ही दिवाळी खास असून त्यांच्या दिवाळीचा आनंद डबल झाला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आई झाली आहे! रविवारी तिने दिल्लीतील रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला असून तिचे पती आणि आप नेते राघव चढ्ढा यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली.

राघव आणि परिणीती यांनी एका पोस्टमध्ये लिहिले – “शेवटी आमचा लाडका मुलगा आमच्या आयुष्यात आला! या छोट्या पाहुण्याच्या आगमनापूर्वीचे दिवस आता आम्हाला आठवतच नाहीत. आमचे हात व्यस्त आहेत, पण हृदये प्रेमाने ओथंबलेली आहेत. आधी आम्ही फक्त एकमेकांचे होतो, आता आमच्याकडे सगळं काही आहे.”

परिणीती आणि राघव यांनी गेल्या वर्षी राजस्थानात पारंपरिक रीतीने लग्नगाठ बांधली होती, आणि आता त्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय