kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, 21 डिसेंबरला निर्णय

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकींचा निकाल हा आधी बुधवारी 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर विजयी उमेदवार निश्चित होणार आहेत.

जालन्यात जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या 18 तर नगरसेवक पदाच्या 232 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.भाजप नेते रावसाहेब दानवे,बबनराव लोणीकर, राजेश टोपे यांच्यासह नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.