kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित आणि आदित्य ठाकरे यांचा झंझावात

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धडाडणाऱया राजकीय नेते व उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. मंगळवारी शिवडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत दणदणीत बाईक रॅली काढण्यात आली.

राज्यातील मागील साडेतीन–चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह 29 महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होता. शहरांमधले सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लोगल्लीत सकाळ-संध्याकाळ निघणाऱया प्रचार रॅली तसेच छोटय़ा-मोठय़ा सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण गजबजून गेले होते. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय नेत्यांनी कुठे सभा घेऊन प्रचाराची सांगता केली, तर काही नेते आणि उमेदवारांनी आपल्या प्रभागांत बाईक रॅली आणि पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.