kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार, पोलीस सुरक्षा वाढवली

प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. रात्री उशिरा झालेल्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, झोनल पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालं. फॉरेन्सिक पथकानी देखील घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई पोलीस काय म्हणाले ?

“इमारतीत गोळीबार झाला आहे. आम्ही गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी सर्व शक्य दृष्टिकोनातून तपास करत आहोत.”

“चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी चार राउंड गोळीबार केला. त्यानंतर, रोहित शेट्टी याच्या जुहू येथील निवासस्थानाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हल्ल्यामागील हेतू अद्याप समोर आलेला नाही,”

“दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस करत आहेत. या प्रकरणातील संशयिताला पकडण्यासाठी गुन्हे शाखेनं बारा पथकं तयार केली आहेत,”

“मुंबईतील जुहू परिसरात रविवारी (1 फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी चार राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. घटना घडली त्यावेळी रोहित शेट्टी घरात होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, हेही अद्याप समोर आलेले नाही,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.