kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ला आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मुळे 70 टक्के नुकसान

अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच एकामागून एक रेकॉर्ड तोडू लागला. सॅक्निल्कच्या मते, या चित्रपटानं फक्त 18 दिवसांतच 177 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. पण, अचानक चित्रपटाची कमाई का थांबली? कारण आहे, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’.

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या कमाईवर ब्रेक लावण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलं नसून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं केलं आहे. त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘हाऊसफुल 5’ची कमाई अचानक थांबली. आमिर खानच्या फिल्मला जवळपास 6000 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आलं. ज्यामुळे ‘हाऊसफुल 5’च्या स्क्रिन्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली.

आमिर खानची फिल्मने चारच दिवसांत 67 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि याची संडेची कमाई जवळपास 28 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे जे प्रेक्षक ‘हाऊसफुल 5’ पाहण्यासाठी जाणार होते, त्यांच्याकडे आता आणखी एका फिल्मचा पर्याय आला आहे आणि प्रेक्षकांनी ‘हाऊसफुल 5’कडे पाठ फिरवून ‘सितारे जमीन पर’ची निवड केली आहे.